५० गाणी गिटारवर वाजवणं आत्ता सोप्पंय!

बस.. एक E-Book पुरेशी आहे ..!

50Marathiganihardcoverbookmockup_y4mdu_2800
  • ५० मराठी गाणी – अगदी चढत्या क्रमाने !
  • व्हिडिओ ट्युटोरियल लिंक्स – ऐका, बघा आणि वाजवा!
  • फक्त ₹225 मध्ये - मर्यादित वेळेसाठी !
  • कुठेही, कधीही वापरा – फोनवर, टॅबवर, लॅपटॉपवर!
  • शिकायला वेळ लागत नाही – लगेच सुरुवात करा!
  • गिटारवर गाणी वाजवायचं स्वप्न आहे? मग आता संधी सोडू नका!

Actual Price :₹ 500/-

Limited Time Offer :₹225/-

00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

हे E-Book घेतलं नाही तर.. 
काय नुकसान होईल?

  • 🎵 ही संधी फक्त ₹225 मध्ये आहे – पुन्हा मिळेलच असं नाही! एवढ्या कमी किंमतीत ५० गाणी + व्हिडिओ लिंक कुठेही मिळणार नाही!
  • 😕 गाणी वाजवता न आल्यामुळे समोरच्या लोकांसमोर गिटार घेण्याची भीती वाटेल! - – मित्रमंडळी किंवा कुटुंबासमोर गिटार घेतला की "अरे वाजवून दाखव ना!" असं म्हणतात, आणि आपण काहीच करू शकत नाही. हे ईबुक असेल, तर तुमचं गाणं तयार असेल!
  • 🕰 इंटरनेटवर फुकट माहिती शोधून वेळ वाया जाईल! - YouTube वर अनेक व्हिडिओ असले तरी अचूक आणि सोप्प्या कोर्ड्स शोधायला तासन्‌तास जातील. यापेक्षा रेडीमेड E-Book असलेलं जास्त फायदेशीर!
  • योग्य गाणी निवडायचा वेळ आणि एनर्जी वाया जाईल! - सुरुवातीला शिकण्यासाठी कोणती गाणी सोपी आहेत, त्यात कोणते कोर्ड्स बरोबर आहेत, हे ठरवणं खूप वेळखाऊ आणि कंटाळवाणं ठरू शकतं.

🔥 तर मग वेळ न दवडता ईबुक डाउनलोड करा आणि लगेच प्रॅक्टिस करायला घ्या ! 🎸

Actual Price :₹ 500/-

Limited Time Offer :₹ 225/-

00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

हो, ही टायपिंग मिस्टेक नाहीय! तुम्ही प्राइज अगदी बरोबर वाचलीत, ₹225/- फक्त.

हे E-Book विकत घेणारे
काय म्हणतात बघा!

instaCommentEBookrohanKadu_a4mjg_430
instaCommentEBookTusharVarande_qymta_442
WhatsAppImage20250427at11_c0otu_443
YTCommentEBookTusharVarande_e1mje_489
instaCommentEBookSontakkepawan_i1njg_453
WhatsAppImage20250427at11_qxnzy_458
WhatsAppImage20250427at11_i3oda_461
instaCommentEBookswNitin_azmzu_436
WhatsAppImage20250427at11_uxmdc_444
YTCommentEBookAjinkya_gwoti_605

🎸 ही PDF का घ्यावी? ६ मजबूत कारणं!

🔥 तर मग, आता लगेच PDF डाउनलोड करा आणि गिटार वाजवा! 🎶 🔥

1️⃣ ५० मराठी गाणी – अगदी चढत्या क्रमाने ! 

– गिटार शिकणाऱ्यांसाठी खास निवडलेली गाणी, सुरुवातीपासूनच धमाल! आधी सोप्पी आणि मग थोडी अवघड.. या क्रमाने मांडणी केली आहे. 

2️⃣ व्हिडिओ ट्युटोरियल लिंक्स – ऐका, बघा आणि वाजवा!

– प्रत्येक गाण्यासाठी व्हिडिओ गाईड
– गोंधळायला काहीच कारण नाही!

3️⃣ फक्त ₹225– लवकरच ही 500 होईल! 

– क्लासेसपेक्षा स्वस्त आणि घरी बसून शिकण्यास सोप्पं!

4️⃣ कुठेही, कधीही वापरा – फोनवर, टॅबवर, लॅपटॉपवर!

– डाऊनलोड करा आणि तुमच्या सोयीनुसार प्रॅक्टिस करा.

IMG8950_uwnta_2000

5️⃣ शिकायला वेळ लागत नाही – लगेच सुरुवात करा!

– सोप्पं chord progression आणि स्ट्रमिंग
– व्यवस्थित Follow केलं तर कोणालाही वाजवता येईल!

6️⃣ गिटारवर गाणी वाजवायचं स्वप्न आहे? मग आता संधी सोडू नका!

– पहिल्या गाण्यापासूनच तुम्हाला कॉन्फिडन्स येईल!

Actual Price :₹ 500/-

Limited Time Offer :₹ 225/-

00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

तुम्हाला यात कोणती गाणी शिकायला मिळतील

  • आता तरी देवा मला पावशील का? 
  • ही चाल तुरू तुरू 
  • मी रात टाकली 
  • माळ्याच्या मळ्यामधे
  • गोमू सगंतीनं
  • जन गण मन
  • टिक टिक वाजते
  • तू दरू का 
  • स्वर्ग हा नवा 
  • सांगा या वेडीला
  • माजे रानी, माजे मोगा
  • ब्रेक अप के बाद
  • गच्चीवरुन कशी दिसते 
  • वेगेवेगे धाऊ 
  • मला सांगा सुख म्हणजे 
  • निंबोनीच्या झाडामागे 
  • पाहिले न मी तुला 
  • फिटे अंधाराचे जाळे 
  • जांभुळ पिकल्या झाडाखाली
  • सूर तेच छेडिता
  • दिल दोस्ती दुनियादारी
  • बहिणाबाई
  • खारी बिस्किट
  • परी म्हणू की सुंदरा
  • साज ह्यो तुझा
  • साजणी - शेखर
  • देखणं पाखरू
  • मन उधाण वाऱ्याचे
  • चांद तू नभातला
  • अग ऐक ना
  • मल्हार वारी
  • वारा गाई गाणे
  • राजा ललकारी
  • काळ्या मातीत मातीत
  • का कळेना
  • राधा ही बावरी
  • कितीदा नव्याने
  • प्रेम की यातना
  • कधी तू
  • धागा धागा
  • दृष्ट लागण्याजोगे सारे
  • धुंद होते शब्द सारे
  • मी डोलकर
  • भिजून गेला वारा
  • वार्‍यावरती गंध पसरला
  • मला वेड लागले
  • सर सुखाची श्रावणी
  • रुपेरी वाळूत
  • हिरवा निसर्ग
  • ऐरणीच्या देवा तुला 

Actual Price :₹ 500/-

Limited Time Offer :₹ 225/-

00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

लाखमोलाचा प्रश्न,
"मी हे सगळं का करतोय? "

HERE'S WHY...

यशवंत दिडवाघ A.K.A. मराठी गिटार मास्टर

FOUNDER & CREATOR OF गिटारगिरी कम्युनिटी

cymty_6000_IMG8921

गिटार शिकण्याचा प्रवास मी २०१० मध्ये सुरू केला, तेव्हा मला समजलं की युट्यूबवरून सगळं शिकणं अशक्य आहे. आणि क्लास लावायचा तर दर महिन्याला फी भरावीच लागेल. आणि गिटार घेण्यासाठी पैसे साठवायचे म्हणजे ते जॉब लागल्यावरच शक्य होणार.

तेव्हा आम्ही वरळी पोलीस कॅम्पमध्ये राहायला होतो. वडील पोलीस. ते इतके कडक होते की गिटार घरात दिसली तर तिचा चुरा झालाच म्हणून समजा! कारण मध्यमवर्गीय घरांमध्ये मुख्यतः कला क्षेत्रापेक्षा अभ्यास आणि महिन्याला ठोस इन्कम मिळवून देणाऱ्या नोकऱ्यांनाच प्राधान्य दिलं जातं. मग गिटार विकत घ्यायला आणि क्लाससाठी त्यांच्याकडे फी मागण्याचं स्वप्नात येणंही शक्य नव्हतं. बिल्डिंगमधल्या एका दादाने जो नुकताच जॉबला लागलेला, त्याने मला गिटार विकत घेऊन दिली. या अटीवर की, ‘क्लासमध्ये शिकून येशील ते मला वेळ काढून शिकवायचं, मला काही क्लासचं वेळापत्रक जमणार नाही. शिफ्ट बदलते आमची सारखी’.

गिटार एकदा हातात आल्यावर मी गिटार प्रॅक्टिस कधी गच्चीवर, तर कधी कुठल्यातरी बागेत कोपऱ्यात कोणाला दिसणार नाही असं बसून केली. प्रॅक्टिस झाली की हळूच त्या दादाला गिटार पुन्हा नेऊन द्यायची. गिटार घेऊन येता-जाता सोसायटीतल्या कोणी पाहिलं की शेरेबाजी सुरू झालीच म्हणून समजा. कोणी त्याला मस्करीत ‘धनुष्य-बाण’ म्हणायचं, कोणी ‘रायफल’, तर कोणी ‘तूनतूनं’.

वर्षभरात मला जॉब लागला, पुण्यात असोशीएट सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून पोस्टिंग झालं. पण त्या धावपळीत गिटार शिकण्याचं स्वप्नं बॅकफुट वर गेलं! तोवर मला वाटायचं क्लास लावणं हे एकच सोल्यूशन आहे! पण आधी क्लाससाठी पैसे नव्हते आणि आता वेळ नव्हता! तुम्ही जॉब करत असाल, तर कदाचित माझी तेव्हाची अवस्था समजू शकाल. वैतागून जॉब सोडला मी एकदाचा. नंतर मॅथ्सचे क्लासेस, टुर गाईड, फ्रीलान्स रायटिंग असं करत पैसे साठवून काही महीने गिटारचा क्लास केला. पण बुडत्याला काडीचा आधार तरी किती वेळ धरून ठेवणार!

बरं त्यात अजून भर म्हणजे, मला आवडतील त्या मराठी गाण्यांच्या टॅबस् तेव्हा नेटवर नव्हत्या. पण आता युट्यूबवर थोडं २-३ तास भटकून झालं की काहीतरी हाती लागण्याचे चान्सेस तरी असतात.

मग एक दिवस मी ठरवलं! ठरवलं की या सगळ्या अडचणींना फ्लश करून टाकायचं. या अडचणी नक्कीच माझ्या आवडीपुढे छोट्या होत्या (म्हणजे अडचणी मोठ्या होत्याच, पण माझी आवड त्याहून मोठी होती).

अर्थात त्यावर सोल्यूशन मला मिळालंही! म्हणून तर ही ‘गिटारगिरी’ सुरू केली. पण पूर्ण स्टोरी आता इथे रंगवून सांगत नाही. शॉर्टमध्ये सांगायचं तर, जेवढं शिकलोय ते शिकवत मी पुढचं गिटारमधलं शिक्षण सुरू ठेवलं. सॉफ्टवेअर इंजिनियर, पत्रकार, वकील असे टॅग असलेला मी, नवी मुंबईतलं वडिलांच २ बी.एच.के. घर सोडून लोवर परेलच्या एका आठ-बाय-दहा फुटाच्या बैठ्याचाळीत २,६६६ /- रुपये भाडं देऊन राहू लागलो. कारण माझी पॅशन! मला माझी पॅशन इतरांवर लादायची नव्हती तर आधी स्वतःलाच सिद्ध करून दाखवायची होती. ६-७ हजारात (घरभाडं+तीन वेळचं जेवण+इतर खर्च भागवत) महिना काढायचा तर जे करावं लागेल ते सगळं केलं. पण गिटार प्रॅक्टिस आता थांबवायची नाही हे मनाशी पक्क ठरवून.

काही महिन्यांपूर्वी ‘तुम्हाला गिटार शिकण्याच्या प्रवासात नक्की काय अडचणी येतात?’ असा प्रश्न मी एका गुगल फॉर्मद्वारे विचारला होता. उत्तरं पहिली आणि चाट पडलो. या महाराष्ट्रात माझ्यासारखे गिटारचे वन-साइड-लव्हर अनेक आहेत यावर शिक्कामोर्तब झालंच एकदाचं. त्यांना मदत करण्यासाठी मला काहीतरी करणं गरजेचं होतं.

मी ज्या अडचणींतून गेलो त्यातून तुम्हाला जाण्याची गरज नाही. म्हणून गाणी शिकण्याच्या प्रोसेसला One Stop Solution मी घेऊन आलोय ‘५० मराठी गाण्यांची PDF/E-Book’ मध्ये, सगळ्यांना परवडेल असं. आणि या E-Book मुले तुम्ही इतर जागी विनाकारण Distract होणार नाही. जे की मी जेव्हा गाणी शिकत होतो तेव्हा हज्जार वेळा होत होतो. 

तुमच्यासाठी जे जमेल ते करायची तयारी मी ठेवली आहे 
आधी Peaceful Guitar Formula मग GuitarGiri Quick Start Guide 
आणि आता हे EBook. .. चला तर मग लागा वाजवायला :) ..  

Compressedonwhatsapp_e0mjm_1131

Actual Price :₹ 500/-

Limited Time Offer :₹ 225/-

00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

FAQs

  • हे EBook मला कधी मिळेल ?- उत्तर – Payment झाल्याझाल्या पुढच्या मिनिटाला EBook Download करायची लिंक तुम्हाला Email द्वारे येईल. आणि PDF Format मध्ये असल्यामुळे मोबाइल, लॅपटॉप, टॅब अशा कुठल्याही डिवाईस वरून हे EBook पाहता येतील.
  • मला E-Book मध्ये काही समजलं नाही तर कसं/कोणाला विचारता येईल? - उत्तर – त्यासाठी आपली GuitarGiri Community ची Silver Membership आहे ती Join करू शकता. किंवा मला Mail द्वारे सुद्धा तुमचे प्रश्न विचारू शकता. 
  • मी हे सगळं ‘YouTube’ वरून Direct शिकू शकत नाही का त्यासाठी EBook कशाला हवं? - उत्तर – युट्यूब एक भन्नाट प्लॅटफॉर्म आहे. ज्ञानाचा महासागरच म्हणा हवं तर. पण म्हणूनच यात बऱ्याचदा हरवायला होतं. या E-Book मुळे तुम्ही focused राहाल. शिवाय लिखित स्वरूपात सर्व Chord Progression मिळतील, ज्याची Revision करणं या EBook मुळे फार सोप्पं जाईल. ५० गाणी व त्याचे chords कागदावर लिहून काढायला नक्कीच १० तास कमीत कमी लागतील. ते वाचतील. जर तुमच्या १० तासांची किंमत रु. 225/- किंवा त्याहून कमी असेल तर हे तुमच्यासाठी नाही! पण खरच तुम्हाला ते १० तास वाया न घालवता त्याऐवजी तेवढी प्रॅक्टिस करायची असेल तर बिनधास्त घ्या हे!!  
  • मी गिटार किती रुपयापर्यंत घ्यावी? - उत्तर – बेसिकसाठी 5 ते 8 हजार पर्यंत सगळेच ब्रॅंड चांगल्या गिटार देतात, जी 2-3 वर्ष हमखास टिकेल, काहींची 10 वर्ष सुद्धा टिकलेली मी पहिली आहे. पण एकदम 2-3 हजारातली वर्षभरात काहीतरी प्रॉब्लेम देतेच. तुमचं बजेट 5 च्या वर जाईपर्यंत थांबलात तर बरं होईल. मग तोवर महिनाभर दुसऱ्याची गिटार वापरली तरी हरकत नाही.
  • हे E-Book मी गिटार घेण्याच्या आधी घेऊ की नंतर? - उत्तर – अगदी काल गिटार हातात घेतलीय अशांसाठी किंवा अजून गिटारच कधी हाताळली नाहीय अशांसाठी हे E-Book नाहीय. तुम्हाला गिटार बेसिक्स जरातरी माहिती हवेत. 
  • मी E-Book विकत घेतल्यानंतर मला ते आवडलं नाही तर? मला माझे पैसे परत मिळतील का? - उत्तर – नाही. कारण Payment झाल्यावर तुम्हाला E-Book Automatically पाठवले जाते. आणि त्याच Digital स्वरूप लक्षात घेता, एकदा दिलेलं E-Book आम्हाला पुन्हा घेता येत नाही. आणि खरंतर त्यात न आवडण्यासारख काहीच नाही. तुम्ही या Page वर दिलेली ५० गाण्यांची यादी संपूर्ण वाचली आणि त्यातली २-३ गाणी शिकताना जरी या E-Book ची तुम्हाला मदत झाली तरी याचे पैसे वसूल झाले असं म्हणायला हरकत नाही. ५० च्या ५० शिकलात तर सोन्याहून पिवळं :) . 

© 2026 GuitarGiri. All Rights Reserved | Design by Yashwant Didwagh