गिटारचे Basics शिका 'फक्त ३ आठवड्यात!'

इथून तिथून गिटार शिकण्यात 'वेळ वाया घालवू नका'!
गिटारगिरी सुरू करताना जे IMPORTANT आहे, ते पहिलं शिकून घ्या.
( चिडचिड न होता आणि दर महिना फी न भरता )

  • प्रत्येकाच्या खिशाला परवडेल असं
  • आपल्या वेळेनुसार केव्हाही
  • Beginners साठी Easy to Follow मार्गदर्शन
  • गिटार शिका Exact Sequence मध्ये
  • वन-टाइम-फी’ मध्ये लाईफ-टाइम Access
    + Weekly  Live Zoom कम्यूनिटी कॉल 
  • मराठीमध्ये पहिल्यांदाच !!!

मला एक गृहस्थ म्हंटले .. हे असं ऑनलाइन शिकण  शक्यच नाहीय !

असा  विचार तुमच्या मनात येण्याआधी हे खालचे विडियो आवर्जून पहावेत :)

तुम्ही तीन-चार महीने (जवळपास 10-12 हजार रुपये) गिटारक्लासची फी भरून, शेवटी पाचव्या महिन्यात अजून काहीच चांगलं वाजत नाहीय म्हणून FRUSTRATE होऊन गिटार वाजवणं सोडून देणार आहात का?

अशी चूक जी .. ALMOST 90% BEGINNER GUITARIST करतात.

  • कारण त्यांना आपण स्वतः रॉकस्टार मधला ‘रणबीर कपूर’ किंवा ‘सिक्रेट सुपरस्टार’ मधली हिरोईन असल्याची स्वप्न दिसू लागतात.
  • ते काही महीने थोडे थोडे पैसे साठवून गिटार घेतात.
  • दर महिना महागड्या क्लास मध्ये फी भरतात .. आणि तरी
  • हवी तशी गिटार वाजत नाही.

त्यांची चिडचिड होते. नक्की माहीत नसतं, What’s Going Wrong !! मानसिक खच्चीकरण होतं. गिटार वाजवू वाटते पण ‘तशी’ मजा येत नसते. मग एक दिवस ते चिडचिड्या मनस्थितीत जोरजोरात वाजवतात, एकदम बेसुर-बेताल. मनातला सगळा राग हात दुखेपर्यंत काढत राहतात. . . पण शेवटी हाती येते.. निराशा. आणि दुखणारे हात.

हे तुमच्या सोबत होऊ देऊ नका. .

हा ‘PAINFUL’ अनुभव तुम्ही ‘SKIP’ करू शकता

वर विडियो पाहिलेत त्यांनी केलं तसं .. 

गिटार शिकण्याच्या पायऱ्या व्यवस्थित समजून घेऊन

PEACEFUL GUITAR FORMULA च्या मदतीने

  • अगदी पहिल्या प्रॅक्टिस VIDEO पासून, तुम्ही वाजवलेली गिटार तुम्हाला आवडायला लागेल.
  • गिटारमधून सूर कसे आणि कधी नीट वाजतात हे समजेल, त्यामुळे आता सध्या एकही ट्यून वाजली नाही तरी, ‘पुढे एक काय पन्नास गाणी वाजतील’ याचा confidence तुमच्यात येईल.
  • बेसिक कन्सेप्ट स्ट्रॉंग तयार होतील.

पहिल्या आठवड्यातच समजेल Peaceful Guitarist होण्याचा रस्ता, जो अगदी पहिल्या स्टेप पासून आनंद देणारा आहे.

हो, ही टायपिंग मिस्टेक नाहीय! तुम्ही प्राइज अगदी बरोबर वाचलीत. फक्त RS.₹ 9,999/-

आता रजिस्टर केल्यावर तुम्हाला हे सगळं मिळेल –

1_i4nta_1314

Main Course - Rs.10,000/-

PEACEFUL GUITAR FORMULA - गिटार शिकताना नक्की कोणत्या गोष्टींना, कोणत्या क्रमाने, किती महत्व द्यावं हे माहीत नसेल तर गिटार शिकण्याचा प्रवास थोडा चिडचिडा होणारच. यावर बेस्ट उपाय म्हणजे हा कोर्स!

Week 1 - Introduction

Course Introduction, Choosing Guitar, Home Work नक्की काय असेल, Basic गिटारची माहिती, Proper Posture, Physics of Sound, What is Important, Conclusion

Week 2 - Skills Needed

डाव्या आणि उजव्या हाताच्या Exercises, Conclusion - सगळं नीट आहे हे कसं समजेल 

Week 3 - First Musical Step

Basic Guitar Theory, Naming Notes on Fretboard, Major Scale Formula, Guitar Tuning, Pick Thickness, C Major Scale, Patterns in Scale, All C Major Scale Chords, Conclusion - Two Possibilities. 

Important Updates In Community

बरेच नवीन उपक्रम आपण राबवत असतो, त्यांची माहिती इथे सांगितली जाते. 

2_cymtc_1314

Bonus 1 - Rs.2,000/-

FRETBOARD CLARITY BLUEPRINT -
नवीन जागी माणूस रस्ता माहीत नसल्यामुळे हरवतो, अगदी तसंच सुरुवातीला आपण गिटार फ्रेटबोर्ड मध्ये हरवून जातो. त्यातून बाहेर येण्याच्या टॉप टिप्स यात मिळतील.

Introduction

Course Introduction

Stationary Fretboard Reading

Normal Naming Using Chromatic Scale, Plus 5 Method, 12 Minus Method

Movable Fretboard Reading

Plus 2 Plus 2 – on E A String, Plus 3 Plus 2 – on D G String, Fun with Movable Methods

Use While Playing Chords

Remembering Chord Key Notes

Practical Implementation

Playing Same note on All Strings, With Metronome 40to80 BPM, 5 Notes 2 Rounds Videos Assignment.

4_k3ndc_1314

Bonus 2 - Rs.3,000/-

STRUMMING FORMULA SIMPLIFIED -
‘स्ट्रमिंग पॅटर्न प्रॅक्टिस कोणत्या प्रकारे करावी म्हणजे गाण्याचा स्ट्रमिंग पॅटर्न ओळखणं/ठरवणं सोप्पं जाईल?’ हा प्रश्न बऱ्याच जणांना सतावतो. त्याची उकल या कोर्स मध्ये होईल.

Introduction

Course Introduction, Skills Required, Counting Using App, Metronome App Download Link.

Fourth Count Strumming Patterns

Patterns Teaching How to Count while Strumming - हा सर्वात main बेसिक आहे Strumming चा 

Eighth Count Strumming Patterns

Intro to Counting 8th counts, 6 Diff Basic Strumming Patterns, Secret Tips on Strumming.

Before You Start Strumming in Songs

Chords Switching on Count, Song Example With Just Simple Down Strums, Song Ex With Any Simple Pattern, Song Ex With Actual Pattern.

Conclude

Lot More To Learn

3_i0mtm_1314

Bonus 3 - Rs.2,000/-

CHORDS FORMATION BLUEPRINT - कोणीतरी सांगितलंय म्हणून आहे तशी कृती करणारे, आणि ती कृती अशीच का आहे, याचा शोध घेणारे’, यात चांगली प्रगती कोणाची होते हे वेगळं सांगायची गरज नाही. गिटारच्या कॉर्डस् अशाच का पकडतात याची विस्तृत उत्तरं यात मिळतील.

Introduction

Course Introduction, Required Skills, Learn To Play Chords like A, Am, Bm, C, D, Dm, E, Em, F, G.

What is Major and Minor Chord?

Major Chords Construction, Minor Chords Construction Explained in Detail.

With Example

With Example of song Maa from Tare Zameen Par, Conclusion. Lot more to learn.

5_uymtu_1314

Bonus 4 - Rs.4,000/-

MUSIC THEORY MASTERY -
गिटारमधून उमटणारे सुर कोणत्या लॉजिकने पटकन समजतील याची माहिती आपण या सेगमेन्ट मध्ये घेऊ !

Introduction

Course Introduction, १२ सुर, Notes For Reference 

Let’s Start

What is Music Theory?, Notes, Chords, Scales, Octaves ani Key, C Means Sa?, Steps or Intervals, Musical Alphabets, Notes on Guitar Neck, 3 Types of Chords

Chord Charts

Major Chords Shapes, Minor Chords Shapes, Barre Chords Shapes

Scales

Major Scales, Minor Scales Explained

Diatonic Chords

Intro to Chords Progression, Deriving Chords from Scale on Paper.

Weekly LIVE QnA Sessions - Community Benefit 

कोर्स बघत असताना तुम्हाला आलेले प्रश्न तुम्ही अगदी समोरासमोर दर बुधवारी रात्री ८ वाजता आपल्या कम्यूनिटी ग्रुप कॉल वर विचारू शकता. आयुष्यभरासाठी!

VIP Telegram Group Support - Community Benefit

कोर्समध्ये शिकत असलेल्या गोष्टी तुम्ही या ग्रुप वर शेयर करू शकता आणि त्यावर तुम्हाला योग्य सल्ला/अभिप्राय दिला जाईल. प्रोत्साहन मिळेल. आपली कम्युनिटी सगळ्यांची आवड एकंच असल्यामुळे गिटारगिरी प्रवासात फूल सपोर्ट करेल.

ता. क. 

दर आठवड्याला बुधवारी रात्री ८ वाजता LIVE Group Call वर तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता. इतरांनी विचारलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं देखील तुम्हाला पाहायला मिळतील. शिवाय भविष्यात या कोर्सेसमध्ये वेळोवेळी अपडेट्स येत राहतील.

हे नक्की कसं केलं जाईल?

STEP 1: तुम्ही या कोर्स मध्ये ENROLL करता

वरील फॉर्म भरून झाल्यावर, पुढील पेजवर पेमेंट करून तुम्ही गिटारगिरी कम्युनिटीचे PAID सभासद बनता

STEP 2: COURSE ACCESS

कोर्स ACCESS LINK २४ तासांच्या आत तुम्ही दिलेल्या इ-मेल वर पाठवली जाईल.

STEP 3:  Weekly LIVE Community Zoom Call

तुम्हाला दिलेल्या PRE-RECORDED विडियो कोर्सला FOLLOW करत असताना तुम्हाला जे काही प्रश्न पडतील ते बुधवारी QnA Session मध्ये विचारता येतील. 

STEP 4: वातावरण निर्मिती

कम्युनिटीत शिकण्याचा फायदा हा की, तुम्ही इतरांना बघून सतत स्वतःला गिटार वाजवण्यासाठी उद्युक्त करता. आणि इतर बरेचसे उपक्रम जे मी इथे सर्व लिहून सांगू शकत नाही! 

सध्या तुम्हाला यासोबत काय काय मिळेल त्याची Total करून सांगतो ! 

Bonus 1 – FRETBOARD CLARITY BLUEPRINT – Rs.2,000/-
Bonus 2 – CHORDS FORMATION BLUEPRINT – Rs.2,000/-
Bonus 3 – STRUMMING FORMULA SIMPLIFIED – Rs.3,000/-
Bonus 4 – MUSIC THEORY MASTERY – Rs.4,000/-

And Community Benefits Like
Weekly Live Group Call (LifeTime) – 45,000/-
And VIP Telegram Group Support(LifeTime) – 25,000/-

Bonus of TOTAL Value: – Rs.81,000/- (अगदी मोफत)

लाखमोलाचा प्रश्न,
"मी हे सगळं का करतोय? "

HERE'S WHY...

यशवंत दिडवाघ A.K.A. मराठी गिटार मास्टर

FOUNDER & CREATOR OF गिटारगिरी कम्युनिटी

cymty_6000_IMG8921

गिटार शिकण्याचा प्रवास मी २०१० मध्ये सुरू केला, तेव्हा मला समजलं की युट्यूबवरून सगळं शिकणं अशक्य आहे. आणि क्लास लावायचा तर दर महिन्याला फी भरावीच लागेल. आणि गिटार घेण्यासाठी पैसे साठवायचे म्हणजे ते जॉब लागल्यावरच शक्य होणार.

तेव्हा आम्ही वरळी पोलीस कॅम्पमध्ये राहायला होतो. वडील पोलीस. ते इतके कडक होते की गिटार घरात दिसली तर तिचा चुरा झालाच म्हणून समजा! कारण मध्यमवर्गीय घरांमध्ये मुख्यतः कला क्षेत्रापेक्षा अभ्यास आणि महिन्याला ठोस इन्कम मिळवून देणाऱ्या नोकऱ्यांनाच प्राधान्य दिलं जातं. मग गिटार विकत घ्यायला आणि क्लाससाठी त्यांच्याकडे फी मागण्याचं स्वप्नात येणंही शक्य नव्हतं. बिल्डिंगमधल्या एका दादाने जो नुकताच जॉबला लागलेला, त्याने मला गिटार विकत घेऊन दिली. या अटीवर की, ‘क्लासमध्ये शिकून येशील ते मला वेळ काढून शिकवायचं, मला काही क्लासचं वेळापत्रक जमणार नाही. शिफ्ट बदलते आमची सारखी’.

गिटार एकदा हातात आल्यावर मी गिटार प्रॅक्टिस कधी गच्चीवर, तर कधी कुठल्यातरी बागेत कोपऱ्यात कोणाला दिसणार नाही असं बसून केली. प्रॅक्टिस झाली की हळूच त्या दादाला गिटार पुन्हा नेऊन द्यायची. गिटार घेऊन येता-जाता सोसायटीतल्या कोणी पहिलं की शेरेबाजी सुरू झालीच म्हणून समजा. कोणी त्याला मस्करीत ‘धनुष्य-बाण’ म्हणायचं, कोणी ‘रायफल’, तर कोणी ‘तूनतूनं’.

वर्षभरात मला जॉब लागला, पुण्यात असोशीएट सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून पोस्टिंग झालं. पण त्या धावपळीत गिटार शिकण्याचं स्वप्नं बॅकफुट वर गेलं! तोवर मला वाटायचं क्लास लावणं हे एकच सोल्यूशन आहे! पण आधी क्लाससाठी पैसे नव्हते आणि आता वेळ नव्हता! तुम्ही जॉब करत असाल, तर कदाचित माझी तेव्हाची अवस्था समजू शकाल. वैतागून जॉब सोडला मी एकदाचा. नंतर मॅथ्सचे क्लासेस, टुर गाईड, फ्रीलान्स रायटिंग असं करत पैसे साठवून काही महीने गिटारचा क्लास केला. पण बुडत्याला काडीचा आधार तरी किती वेळ धरून ठेवणार!

बरं त्यात अजून भर म्हणजे, मला आवडतील त्या मराठी गाण्यांच्या टॅबस् तेव्हा नेटवर नव्हत्या, आत्ताही नसतातच म्हणा. पण आता युट्यूबवर थोडं २-३ तास भटकून झालं की काहीतरी हाती लागण्याचे चान्सेस तरी असतात.

मग एक दिवस मी ठरवलं! ठरवलं की या सगळ्या अडचणींना फ्लश करून टाकायचं. या अडचणी नक्कीच माझ्या आवडीपुढे छोट्या होत्या (म्हणजे अडचणी मोठ्या होत्याच, पण माझी आवड त्याहून मोठी होती).

अर्थात त्यावर सोल्यूशन मला मिळालंही! म्हणून तर ही ‘गिटारगिरी’ सुरू केली. पण पूर्ण स्टोरी आता इथे रंगवून सांगत नाही. शॉर्टमध्ये सांगायचं तर, जेवढं शिकलोय ते शिकवत मी पुढचं गिटारमधलं शिक्षण सुरू ठेवलं. सॉफ्टवेअर इंजिनियर, पत्रकार, वकील असे टॅग असलेला मी, नवी मुंबईतलं वडिलांच २ बी.एच.के. घर सोडून लोवर परेलच्या एका आठ-बाय-दहा फुटाच्या बैठ्याचाळीत २,६६६ /- रुपये भाडं देऊन राहू लागलो. कारण माझी पॅशन! मला माझी पॅशन इतरांवर लादायची नव्हती तर आधी स्वतःलाच सिद्ध करून दाखवायची होती. ६-७ हजारात (घरभाडं+तीन वेळचं जेवण+इतर खर्च भागवत) महिना काढायचा तर जे करावं लागेल ते सगळं केलं. पण गिटार प्रॅक्टिस आता थांबवायची नाही हे मनाशी पक्क ठरवून.

काही महिन्यांपूर्वी ‘तुम्हाला गिटार शिकण्याच्या प्रवासात नक्की काय अडचणी येतात?’ असा प्रश्न मी एका गुगल फॉर्मद्वारे विचारला होता. उत्तरं पहिली आणि चाट पडलो. या महाराष्ट्रात माझ्यासारखे गिटारचे वन-साइड-लव्हर अनेक आहेत यावर शिक्कामोर्तब झालंच एकदाचं. त्यांना मदत करण्यासाठी मला काहीतरी करणं गरजेचं होतं.

मी ज्या अडचणींतून गेलो त्यातून तुम्हाला जाण्याची गरज नाही. या सगळ्यावर One Stop Solution मी घेऊन आलोय ‘Peaceful Guitar Formula’ मध्ये, सगळ्यांना परवडेल असं.

आता SAY ‘BYE BYE’ TO..

प्रत्येक अडचणीला जी तुमच्या आणि ‘गिटारगिरी’च्या मध्ये येतेय 🙂

गिटारगिरीची मजा लुटणारे

Peaceful Guitar Formula बद्दल काय म्हणतात बघूया..

FAQs

  • हा कोर्स मी किती वेळ बघू शकते/शकतो?- उत्तर – तुम्ही हवं तेव्हा लॉगिन करू शकता, वरील प्राइज मध्ये तुम्हाला लाईफ-टाइम अॅक्सेस मिळणार आहे. हा रेकॉर्डेड व्हिडिओ गिटार क्लास तुम्हाला सवडीनुसार हवा तेव्हा बघता येईल. अगणित वेळा! मोबाइल, लॅपटॉप, टॅब अशा कुठल्याही डिवाईस वरून हे कोर्स पाहता येतील.
  • मला कोर्स मध्ये काही समजलं नाही तर कसं/कोणाला विचारता येईल? - उत्तर – आपल्या कम्युनिटीचा दर आठवड्याला बुधवारी रात्री ८ वाजता एक Weekly Live Video Call असेल Zoom वरून, त्यात तुम्हाला तुमच्या शंका थेट विचारता येतील. इतर मेंबर्सच्या शंका सुद्धा ऐकायला मिळतील. शिवाय आपल्या फेसबुक ग्रुप वर तुम्हाला तुमचे प्रश्न पोस्ट करता येतील. स्वतः यशवंत किंवा ‘मराठी गिटार मास्टर’ कम्युनिटी मधील कोणीही अनुभवी व्यक्ती तुमची शंका दूर करतील.
  • मी हे सगळं ‘YouTube’ वरून शिकू शकत नाही का? - उत्तर – युट्यूब एक भन्नाट प्लॅटफॉर्म आहे. ज्ञानाचा महासागरच म्हणा हवं तर. पण तुमच्या प्रश्नाच्या उत्तराचा थेंब या महासागरात शोधण्यासाठी डझनभर तास आणि तुमच्या डिवाईसची बॅटरी वाया घालवावे लागतील. युट्यूब वरून शिकणं चांगलं नाही असं नाही. आमचा स्वतःचा सुद्धा युट्यूब चॅनल आहे, ज्यावर आपण इतर गिटार संबंधित माहिती पोस्ट करत असतो. पण फक्त युट्यूब वरून शिकणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. शिवाय तिथे हव्या त्या क्रमात लेसन्स दिलेले नसतात.
    आणि त्याहून महत्वाचं मला असं वाटतं की, तुमच्या वेळेची किंमत नक्की किती? यावर सगळं डिपेंड करतं.
    या कोर्समुळे तुमचा वेळ वाचेल. आणि तुमच्या वाजवण्यात इम्प्रूवमेंट ‘युट्यूब’पेक्षा पटकन दिसतील. काही लोकं तर या कोर्स एवढे पैसे एक किंवा दोन तासाच्या गिटारक्लास वर खर्च करतात. जर तुमच्या वेळेची इतकीही किंमत नसेल, तर ती किंमत तेवढी होईपर्यंत युट्यूब वरच शिकलेलं बरं.
  • मी गिटार किती रुपयापर्यंत घ्यावी? - उत्तर – बेसिकसाठी 5 ते 8 हजार पर्यंत सगळेच ब्रॅंड चांगल्या गिटार देतात, जी 2-3 वर्ष हमखास टिकेल, काहींची 10 वर्ष सुद्धा टिकलेली मी पहिली आहे. पण एकदम 2-3 हजारातली वर्षभरात काहीतरी प्रॉब्लेम देतेच. तुमचं बजेट 5 च्या वर जाईपर्यंत थांबलात तर बरं होईल. मग तोवर महिनाभर दुसऱ्याची गिटार वापरली तरी हरकत नाही.
  • हा कोर्स मी गिटार घेण्याच्या आधी घेऊ की नंतर? - उत्तर – हे पूर्ण पणे तुमच्यावर डिपेंड करतं. तुमचं बजेट असेल तर दोन्ही एकसाथ घ्यायला हरकत नाही. पण let me tell you, ही कोर्सची प्राइज कधीही वाढू शकते.
  • ‘Peaceful Guitar Formula’ कोर्स कधी सुरू होईल? - उत्तर – तुम्ही Successful Payment केल्यावर तुम्हाला २४ तासांत Access लिंक्स मेल मधून मिळतील. त्यावर क्लिक करून तुम्हाला तुमचा ‘गिटारगिरी’चा प्रवास सुरू करता येईल. 
  • मी कोर्स विकत घेतल्यानंतर मला तो आवडला नाही तर? मला माझे पैसे परत मिळतील का? - उत्तर – नक्कीच! तुम्हाला कोर्स आवडला नाही तर तुम्ही तुमचं सभासदत्व १४ दिवसांच्या आत  रद्द करू शकता. तुम्हाला हवं ते मी देऊ शकत नसेन तर मला तुमचे पैसे घेण्यात मजा येणार नाही. फक्त मला Connect@ guitargiri.com वर मेल करा. पाच दिवसांत तुमचे पैसे परत केले जातील :) . 
    गिटार खूप आकर्षक वाद्य आहे, आणि माझी ऑफर सुद्धा. भावनिक होऊन Enroll करणाऱ्यांना माझी एकच विनंती की, कृपया, खरंच तुम्ही गिटारकोर्स पाहिला, त्यावर प्रयत्न केले आणि तो नाही पटला तरच पूर्ण हक्काने रिफंड मागा. माझ्याकडे Already ११००+ लोकांची कम्युनिटी आहे, जी मला कुटुंबाप्रमाणे आहे. मला त्यांच्या गिटारगिरीवर लक्ष द्यायला जास्त आवडेल. आपल्या सगळ्यांचाच वेळ महत्वाचा आहे. तुम्हाला वाटतंय की, तुम्ही  गिटारला दिवसातून 15 मिनिट सुद्धा प्रॅक्टिससाठी देऊ शकत नाही, तर हा कोर्स तुमच्यासाठी नाही, In Fact गिटार हे वाद्यच तुमच्यासाठी नाही आहे. त्यामुळे माझ्यासोबत असणाऱ्या मराठी गिटार मास्टर्सच्या Skills वर माझं पूर्ण लक्ष रहावं, यासाठी मला तुम्ही इतकी मदत तर नक्कीच करू शकता. समजून घेतल्याबद्दल धन्यवाद!
+Add Row
+Add Row

हा कोर्स कोणासाठी आहे ?

  • गिटार अगदी सुरुवातीपासून शिकायची असेल त्यांच्यासाठी.
  • याआधी गिटार शिकण्याचा प्रयत्न केला पण काही अडचणींमुळे जमलं नाही.
  • सर्व वयोगटातल्या व्यक्तींसाठी.
  • कुटुंबातील सर्वजण केवळ एका रजिस्ट्रेशनवरून हा कोर्स बघू शकतात. लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठी गिटार खूप मस्त ऑप्शन आहे. शिवाय कामाचा तणाव हलका करू इच्छिणाऱ्यांना सुद्धा याचा उपयोग होईल.
  • तुम्ही इतर ठिकाणी फ्री videos बघून शिकण्याचा प्रयत्न करताय पण फार प्रगती नाहीये, तर वेळ वाचविण्यासाठी हा कोर्स तुमच्यासाठी सुद्धा आहे.

हा कोर्स कोणासाठी नाहीये ?

  • तुम्ही 20-40 chords अगदी आरामात वाजवता, आणि त्याच्या मागचं लॉजिक सुद्धा माहिती आहे. थोडक्यात, म्युझिक थियरी बऱ्यापैकी माहिती आहे, आणि तुम्ही advance playing स्टाइल (Finger Style, Percussive Guitar, Staff Notation etc.) शिकण्यासाठी कोर्स शोधत आहात तर हा कोर्स तुमच्यासाठी नाही. हे कोर्सेस आपण in future जाहीर करणार आहोत.
  • तुम्हाला गिटारचं बेसिक क्लियर न करता डायरेक्ट गाणी शिकण्यात वर्ष-वर्ष वाया घालवायची असतील तर हा कोर्स तुमच्यासाठी नक्कीच नाही.
uzody_500_GuitarGiriFEviconPNGformat

© 2025 GuitarGiri.com . All Rights Reserved | Design by Yashwant Didwagh