त्यांची चिडचिड होते. नक्की माहीत नसतं, What’s Going Wrong !! मानसिक खच्चीकरण होतं. गिटार वाजवू वाटते पण ‘तशी’ मजा येत नसते. मग एक दिवस ते चिडचिड्या मनस्थितीत जोरजोरात वाजवतात, एकदम बेसुर-बेताल. मनातला सगळा राग हात दुखेपर्यंत काढत राहतात. . . पण शेवटी हाती येते.. निराशा. आणि दुखणारे हात.
PEACEFUL GUITAR FORMULA - गिटार शिकताना नक्की कोणत्या गोष्टींना, कोणत्या क्रमाने, किती महत्व द्यावं हे माहीत नसेल तर गिटार शिकण्याचा प्रवास थोडा चिडचिडा होणारच. यावर बेस्ट उपाय म्हणजे हा कोर्स!
FRETBOARD CLARITY BLUEPRINT -
नवीन जागी माणूस रस्ता माहीत नसल्यामुळे हरवतो, अगदी तसंच सुरुवातीला आपण गिटार फ्रेटबोर्ड मध्ये हरवून जातो. त्यातून बाहेर येण्याच्या टॉप टिप्स यात मिळतील.
STRUMMING FORMULA SIMPLIFIED -
‘स्ट्रमिंग पॅटर्न प्रॅक्टिस कोणत्या प्रकारे करावी म्हणजे गाण्याचा स्ट्रमिंग पॅटर्न ओळखणं/ठरवणं सोप्पं जाईल?’ हा प्रश्न बऱ्याच जणांना सतावतो. त्याची उकल या कोर्स मध्ये होईल.
CHORDS FORMATION BLUEPRINT -
कोणीतरी सांगितलंय म्हणून आहे तशी कृती करणारे, आणि ती कृती अशीच का आहे, याचा शोध घेणारे’, यात चांगली प्रगती कोणाची होते हे वेगळं सांगायची गरज नाही. गिटारच्या कॉर्डस् अशाच का पकडतात याची विस्तृत उत्तरं यात मिळतील.
MUSIC THEORY MASTERY -
गिटारमधून उमटणारे सुर कोणत्या लॉजिकने पटकन समजतील याची माहिती आपण या सेगमेन्ट मध्ये घेऊ !
कोर्स बघत असताना तुम्हाला आलेले प्रश्न तुम्ही अगदी समोरासमोर दर बुधवारी रात्री ८ वाजता आपल्या कम्यूनिटी ग्रुप कॉल वर विचारू शकता. आयुष्यभरासाठी!
कोर्समध्ये शिकत असलेल्या गोष्टी तुम्ही या ग्रुप वर शेयर करू शकता आणि त्यावर तुम्हाला योग्य सल्ला/अभिप्राय दिला जाईल. प्रोत्साहन मिळेल. आपली कम्युनिटी सगळ्यांची आवड एकंच असल्यामुळे गिटारगिरी प्रवासात फूल सपोर्ट करेल.
दर आठवड्याला बुधवारी रात्री ८ वाजता LIVE Group Call वर तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता. इतरांनी विचारलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं देखील तुम्हाला पाहायला मिळतील. शिवाय भविष्यात या कोर्सेसमध्ये वेळोवेळी अपडेट्स येत राहतील.
वरील फॉर्म भरून झाल्यावर, पुढील पेजवर पेमेंट करून तुम्ही गिटारगिरी कम्युनिटीचे PAID सभासद बनता
कोर्स ACCESS LINK २४ तासांच्या आत तुम्ही दिलेल्या इ-मेल वर पाठवली जाईल.
तुम्हाला दिलेल्या PRE-RECORDED विडियो कोर्सला FOLLOW करत असताना तुम्हाला जे काही प्रश्न पडतील ते बुधवारी QnA Session मध्ये विचारता येतील.
कम्युनिटीत शिकण्याचा फायदा हा की, तुम्ही इतरांना बघून सतत स्वतःला गिटार वाजवण्यासाठी उद्युक्त करता. आणि इतर बरेचसे उपक्रम जे मी इथे सर्व लिहून सांगू शकत नाही!
Bonus 1 – FRETBOARD CLARITY BLUEPRINT – Rs.2,000/-
Bonus 2 – CHORDS FORMATION BLUEPRINT – Rs.2,000/-
Bonus 3 – STRUMMING FORMULA SIMPLIFIED – Rs.3,000/-
Bonus 4 – MUSIC THEORY MASTERY – Rs.4,000/-
And Community Benefits Like
Weekly Live Group Call (LifeTime) – 45,000/-
And VIP Telegram Group Support(LifeTime) – 25,000/-

गिटार शिकण्याचा प्रवास मी २०१० मध्ये सुरू केला, तेव्हा मला समजलं की युट्यूबवरून सगळं शिकणं अशक्य आहे. आणि क्लास लावायचा तर दर महिन्याला फी भरावीच लागेल. आणि गिटार घेण्यासाठी पैसे साठवायचे म्हणजे ते जॉब लागल्यावरच शक्य होणार.
तेव्हा आम्ही वरळी पोलीस कॅम्पमध्ये राहायला होतो. वडील पोलीस. ते इतके कडक होते की गिटार घरात दिसली तर तिचा चुरा झालाच म्हणून समजा! कारण मध्यमवर्गीय घरांमध्ये मुख्यतः कला क्षेत्रापेक्षा अभ्यास आणि महिन्याला ठोस इन्कम मिळवून देणाऱ्या नोकऱ्यांनाच प्राधान्य दिलं जातं. मग गिटार विकत घ्यायला आणि क्लाससाठी त्यांच्याकडे फी मागण्याचं स्वप्नात येणंही शक्य नव्हतं. बिल्डिंगमधल्या एका दादाने जो नुकताच जॉबला लागलेला, त्याने मला गिटार विकत घेऊन दिली. या अटीवर की, ‘क्लासमध्ये शिकून येशील ते मला वेळ काढून शिकवायचं, मला काही क्लासचं वेळापत्रक जमणार नाही. शिफ्ट बदलते आमची सारखी’.
गिटार एकदा हातात आल्यावर मी गिटार प्रॅक्टिस कधी गच्चीवर, तर कधी कुठल्यातरी बागेत कोपऱ्यात कोणाला दिसणार नाही असं बसून केली. प्रॅक्टिस झाली की हळूच त्या दादाला गिटार पुन्हा नेऊन द्यायची. गिटार घेऊन येता-जाता सोसायटीतल्या कोणी पहिलं की शेरेबाजी सुरू झालीच म्हणून समजा. कोणी त्याला मस्करीत ‘धनुष्य-बाण’ म्हणायचं, कोणी ‘रायफल’, तर कोणी ‘तूनतूनं’.
वर्षभरात मला जॉब लागला, पुण्यात असोशीएट सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून पोस्टिंग झालं. पण त्या धावपळीत गिटार शिकण्याचं स्वप्नं बॅकफुट वर गेलं! तोवर मला वाटायचं क्लास लावणं हे एकच सोल्यूशन आहे! पण आधी क्लाससाठी पैसे नव्हते आणि आता वेळ नव्हता! तुम्ही जॉब करत असाल, तर कदाचित माझी तेव्हाची अवस्था समजू शकाल. वैतागून जॉब सोडला मी एकदाचा. नंतर मॅथ्सचे क्लासेस, टुर गाईड, फ्रीलान्स रायटिंग असं करत पैसे साठवून काही महीने गिटारचा क्लास केला. पण बुडत्याला काडीचा आधार तरी किती वेळ धरून ठेवणार!
बरं त्यात अजून भर म्हणजे, मला आवडतील त्या मराठी गाण्यांच्या टॅबस् तेव्हा नेटवर नव्हत्या, आत्ताही नसतातच म्हणा. पण आता युट्यूबवर थोडं २-३ तास भटकून झालं की काहीतरी हाती लागण्याचे चान्सेस तरी असतात.
मग एक दिवस मी ठरवलं! ठरवलं की या सगळ्या अडचणींना फ्लश करून टाकायचं. या अडचणी नक्कीच माझ्या आवडीपुढे छोट्या होत्या (म्हणजे अडचणी मोठ्या होत्याच, पण माझी आवड त्याहून मोठी होती).
अर्थात त्यावर सोल्यूशन मला मिळालंही! म्हणून तर ही ‘गिटारगिरी’ सुरू केली. पण पूर्ण स्टोरी आता इथे रंगवून सांगत नाही. शॉर्टमध्ये सांगायचं तर, जेवढं शिकलोय ते शिकवत मी पुढचं गिटारमधलं शिक्षण सुरू ठेवलं. सॉफ्टवेअर इंजिनियर, पत्रकार, वकील असे टॅग असलेला मी, नवी मुंबईतलं वडिलांच २ बी.एच.के. घर सोडून लोवर परेलच्या एका आठ-बाय-दहा फुटाच्या बैठ्याचाळीत २,६६६ /- रुपये भाडं देऊन राहू लागलो. कारण माझी पॅशन! मला माझी पॅशन इतरांवर लादायची नव्हती तर आधी स्वतःलाच सिद्ध करून दाखवायची होती. ६-७ हजारात (घरभाडं+तीन वेळचं जेवण+इतर खर्च भागवत) महिना काढायचा तर जे करावं लागेल ते सगळं केलं. पण गिटार प्रॅक्टिस आता थांबवायची नाही हे मनाशी पक्क ठरवून.
काही महिन्यांपूर्वी ‘तुम्हाला गिटार शिकण्याच्या प्रवासात नक्की काय अडचणी येतात?’ असा प्रश्न मी एका गुगल फॉर्मद्वारे विचारला होता. उत्तरं पहिली आणि चाट पडलो. या महाराष्ट्रात माझ्यासारखे गिटारचे वन-साइड-लव्हर अनेक आहेत यावर शिक्कामोर्तब झालंच एकदाचं. त्यांना मदत करण्यासाठी मला काहीतरी करणं गरजेचं होतं.
मी ज्या अडचणींतून गेलो त्यातून तुम्हाला जाण्याची गरज नाही. या सगळ्यावर One Stop Solution मी घेऊन आलोय ‘Peaceful Guitar Formula’ मध्ये, सगळ्यांना परवडेल असं.