









आयुष्यातील पहिलं गाणं शिकत असताना नक्की काय काय लक्षात घ्यावं हे सांगणारी Module.

कोणतही गाणं स्वतःहून शोधत/शिकत असताना नक्की काय काय करावं हे सांगणारी Module.

गाता गाता Strumming नक्की का जमत नाही, आणि कसं जमवून घेता येईल याची Conceptual बांधणी योग्य क्रमाने या Module मध्ये करून दिली आहे.

गिटार शिकताना बऱ्याचदा 'नक्की काय काय शिकायचं आहे' हे ध्येय निश्चित नसल्यामुळे Progress होत नाही. So Progress Continuously होत राहावी यासाठी काय करायचं हे या Module मध्ये सांगितलं आहे.


गिटारगिरीचा सर्वात जास्त चर्चेत असणारा Course म्हणजे 'Peaceful Guitar Formula', त्यातील सुरुवातीचे १२-१५ विडियो इथे तुमच्यासाठी कुठलीही जास्तीची फी न आकरता खुले करण्यात आले आहेत.

गिटार शिकण्याचा प्रवास मी २०१० मध्ये सुरू केला, तेव्हा मला समजलं की युट्यूबवरून सगळं शिकणं अशक्य आहे. आणि क्लास लावायचा तर दर महिन्याला फी भरावीच लागेल. आणि गिटार घेण्यासाठी पैसे साठवायचे म्हणजे ते जॉब लागल्यावरच शक्य होणार.
तेव्हा आम्ही वरळी पोलीस कॅम्पमध्ये राहायला होतो. वडील पोलीस. ते इतके कडक होते की गिटार घरात दिसली तर तिचा चुरा झालाच म्हणून समजा! कारण मध्यमवर्गीय घरांमध्ये मुख्यतः कला क्षेत्रापेक्षा अभ्यास आणि महिन्याला ठोस इन्कम मिळवून देणाऱ्या नोकऱ्यांनाच प्राधान्य दिलं जातं. मग गिटार विकत घ्यायला आणि क्लाससाठी त्यांच्याकडे फी मागण्याचं स्वप्नात येणंही शक्य नव्हतं. बिल्डिंगमधल्या एका दादाने जो नुकताच जॉबला लागलेला, त्याने मला गिटार विकत घेऊन दिली. या अटीवर की, ‘क्लासमध्ये शिकून येशील ते मला वेळ काढून शिकवायचं, मला काही क्लासचं वेळापत्रक जमणार नाही. शिफ्ट बदलते आमची सारखी’.
गिटार एकदा हातात आल्यावर मी गिटार प्रॅक्टिस कधी गच्चीवर, तर कधी कुठल्यातरी बागेत कोपऱ्यात कोणाला दिसणार नाही असं बसून केली. प्रॅक्टिस झाली की हळूच त्या दादाला गिटार पुन्हा नेऊन द्यायची. गिटार घेऊन येता-जाता सोसायटीतल्या कोणी पहिलं की शेरेबाजी सुरू झालीच म्हणून समजा. कोणी त्याला मस्करीत ‘धनुष्य-बाण’ म्हणायचं, कोणी ‘रायफल’, तर कोणी ‘तूनतूनं’.
वर्षभरात मला जॉब लागला, पुण्यात असोशीएट सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून पोस्टिंग झालं. पण त्या धावपळीत गिटार शिकण्याचं स्वप्नं बॅकफुट वर गेलं! तोवर मला वाटायचं क्लास लावणं हे एकच सोल्यूशन आहे! पण आधी क्लाससाठी पैसे नव्हते आणि आता वेळ नव्हता! तुम्ही जॉब करत असाल, तर कदाचित माझी तेव्हाची अवस्था समजू शकाल. वैतागून जॉब सोडला मी एकदाचा. नंतर मॅथ्सचे क्लासेस, टुर गाईड, फ्रीलान्स रायटिंग असं करत पैसे साठवून काही महीने गिटारचा क्लास केला. पण बुडत्याला काडीचा आधार तरी किती वेळ धरून ठेवणार!
बरं त्यात अजून भर म्हणजे, मला आवडतील त्या मराठी गाण्यांच्या टॅबस् तेव्हा नेटवर नव्हत्या, आत्ताही नसतातच म्हणा. पण आता युट्यूबवर थोडं २-३ तास भटकून झालं की काहीतरी हाती लागण्याचे चान्सेस तरी असतात.
मग एक दिवस मी ठरवलं! ठरवलं की या सगळ्या अडचणींना फ्लश करून टाकायचं. या अडचणी नक्कीच माझ्या आवडीपुढे छोट्या होत्या (म्हणजे अडचणी मोठ्या होत्याच, पण माझी आवड त्याहून मोठी होती).
अर्थात त्यावर सोल्यूशन मला मिळालंही! म्हणून तर ही ‘गिटारगिरी’ सुरू केली. पण पूर्ण स्टोरी आता इथे रंगवून सांगत नाही. शॉर्टमध्ये सांगायचं तर, जेवढं शिकलोय ते शिकवत मी पुढचं गिटारमधलं शिक्षण सुरू ठेवलं. सॉफ्टवेअर इंजिनियर, पत्रकार, वकील असे टॅग असलेला मी, नवी मुंबईतलं वडिलांच २ बी.एच.के. घर सोडून लोवर परेलच्या एका आठ-बाय-दहा फुटाच्या बैठ्याचाळीत २,६६६ /- रुपये भाडं देऊन राहू लागलो. कारण माझी पॅशन! मला माझी पॅशन इतरांवर लादायची नव्हती तर आधी स्वतःलाच सिद्ध करून दाखवायची होती. ६-७ हजारात (घरभाडं+तीन वेळचं जेवण+इतर खर्च भागवत) महिना काढायचा तर जे करावं लागेल ते सगळं केलं. पण गिटार प्रॅक्टिस आता थांबवायची नाही हे मनाशी पक्क ठरवून.
काही महिन्यांपूर्वी ‘तुम्हाला गिटार शिकण्याच्या प्रवासात नक्की काय अडचणी येतात?’ असा प्रश्न मी एका गुगल फॉर्मद्वारे विचारला होता. उत्तरं पहिली आणि चाट पडलो. या महाराष्ट्रात माझ्यासारखे गिटारचे वन-साइड-लव्हर अनेक आहेत यावर शिक्कामोर्तब झालंच एकदाचं. त्यांना मदत करण्यासाठी मला काहीतरी करणं गरजेचं होतं.
मी ज्या अडचणींतून गेलो त्यातून तुम्हाला जाण्याची गरज नाही. तुम्हाला गिटारगिरी सुरू करण्याआधी किंवा गिटार विकत घेण्याआधी काय काय माहिती असणं गरजेच आहे हे सर्व मी 'GuitarGiri Quick Start Guide' मध्ये समाविष्ट केलंय, जेणेकरून सगळ्यांना परवडेल अशा प्रकारे तुम्ही गिटार या छंदाला जोपासण्याच्या विचाराला पुढे घेऊन जाऊ शकता.











