फक्त एका महिन्यात गाणी वाजवायला शिका !

बस.. हा एक Course पुरेसा आहे ..!
कोणताही अनुभव नसेल तरी चालेल – या कोर्समधून तुम्ही Ukulele सहज शिकू शकता!

  • बेसिक पासून सुरुवात – अगदी चढत्या क्रमाने !
  • आपल्या वेळेनुसार केव्हाही - व्हिडिओ ट्युटोरियल – ऐका, बघा आणि वाजवा!
  • Beginners साठी Easy to Follow मार्गदर्शन
  • कुठेही, कधीही वापरा – फोनवर, टॅबवर, लॅपटॉपवर!
  • Life Time Video Course Access
  • मराठीमध्ये पहिल्यांदाच !!

Fees : ₹ 2,000/-

50% Off

Today's Limited Time Offer : ₹ 999/-

00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

Ukulele Simplified या Course ची एक धावती ओळख
तुम्हाला खालील विडियो मधून होईल 

❌ जर घेतला नाही तर काय Miss कराल?

  • 🎶 तुमच्या मनातलं ‘गाणी वाजवायचं’ स्वप्न पुन्हा पुढे ढकललं जाईल– "कधी ना कधी शिकेन..." म्हणता म्हणता वेळ निघून जाईल!
  • ❓ YouTube वर भरपूर गोंधळ– कुठून सुरुवात करावी, किती प्रॅक्टिस करावी, काहीच कळत नाही!
  • 😕 मूळ चुका समजत नाहीत – आणि तेच शिकून बसता– चुकीच्या पद्धतीमुळे बोटं दुखतात, chords लागत नाहीत!
  • 🎤 मराठीतून शिकण्याची सुवर्णसंधी मिस कराल– इंग्रजीत शिकताना तो flow आणि connection येत नाही.
  • 💸 खूप वेळ आणि पैसे फुकट जातील– मोफत ट्युटोरियल्समधून काहीच स्पष्ट होत नाही, frustration वाढतं.
  • 🎯 तुमच्यातल्या कलाकाराला ‘शांत’ बसायला लागेल– Ukulele ची मजा अनुभवण्याआधीच हार मानाल.

💡 "मी का घ्यावा हा कोर्स?"

1️⃣ तुम्हाला आधी म्युझिकचं काही कळत नसलं तरी हा कोर्स तुमच्यासाठी आहे!

– म्युझिकल background नाही म्हणून बऱ्याचदा आपलं कलेपासून अंतर वय वाढेल तसं वाढत जातं, आता तसं होणार नाही! 

2️⃣ Chords, Strumming, Rhythm यांचं Step-by-Step मार्गदर्शन

– म्हणजे अगदी जे गरजेच आहे ते सर्व इथे आहे ! 

3️⃣ मराठीतून शिकताना आत्मविश्वास वाढतो

– मातृभाषेतून शिकणं नेहमीच जास्त सोयीस्कर असतं. Research सुद्धा हेच सांगतो.

4️⃣ हा कोर्स शिस्तबद्ध आहे – गाणी वाजवायचं स्वप्न आता खरं होईल

– अगदी बेसिक पासून गाणी वाजवण्यापर्यंत सर्व मार्गदर्शन यात आहे. 

5️⃣ Ukulele शिकणं खूप सोपं आहे – पण चुकीच्या पद्धतीने शिकल्यास गोंधळ होतो

– हा गोंधळ बऱ्याच जणांचा झालेला मी पाहिलाय म्हणून सांगतोय. अनुभवाचे बोल आहेत!

6️⃣ YouTube वर खूप माहिती आहे, पण ती गोंधळात टाकणारी आहे

– आणि आपल्याला गोंधळ नाही सॉफ्ट गाणी वाजवायची आहेत :) . 

🔥 तर मग, आता लगेच Ukulele Simplified Course ला Enroll करा आणि वाजवा! 🎶 🔥

Fees : ₹ 2,000/-

50% Off

Today's Limited Time Offer : ₹ 999/-

00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

तुम्हाला यात कोणती गाणी शिकायला मिळतील

  • आता तरी देवा मला पावशील का? 
  • मी रात टाकली 
  • माळ्याच्या मळ्यामधे
  • धागा धागा
  • मी डोलकर
  • तू दूर का  
  • ब्रेक अप के बाद
  • साज ह्यो तुझा
  • अग ऐक ना
  • Happy Birthday To You

लाखमोलाचा प्रश्न,
"मी हे सगळं का करतोय? "

HERE'S WHY...

यशवंत दिडवाघ A.K.A. मराठी गिटार मास्टर

FOUNDER & CREATOR OF गिटारगिरी कम्युनिटी

Ukulele_i0mtg_1500

गिटार शिकण्याचा प्रवास मी २०१० मध्ये सुरू केला, तेव्हा मला समजलं की युट्यूबवरून सगळं शिकणं अशक्य आहे. आणि क्लास लावायचा तर दर महिन्याला फी भरावीच लागेल. आणि गिटार घेण्यासाठी पैसे साठवायचे म्हणजे ते जॉब लागल्यावरच शक्य होणार.

तेव्हा आम्ही वरळी पोलीस कॅम्पमध्ये राहायला होतो. वडील पोलीस. ते इतके कडक होते की गिटार घरात दिसली तर तिचा चुरा झालाच म्हणून समजा! कारण मध्यमवर्गीय घरांमध्ये मुख्यतः कला क्षेत्रापेक्षा अभ्यास आणि महिन्याला ठोस इन्कम मिळवून देणाऱ्या नोकऱ्यांनाच प्राधान्य दिलं जातं. मग गिटार विकत घ्यायला आणि क्लाससाठी त्यांच्याकडे फी मागण्याचं स्वप्नात येणंही शक्य नव्हतं. बिल्डिंगमधल्या एका दादाने जो नुकताच जॉबला लागलेला, त्याने मला गिटार विकत घेऊन दिली. या अटीवर की, ‘क्लासमध्ये शिकून येशील ते मला वेळ काढून शिकवायचं, मला काही क्लासचं वेळापत्रक जमणार नाही. शिफ्ट बदलते आमची सारखी’.

गिटार एकदा हातात आल्यावर मी गिटार प्रॅक्टिस कधी गच्चीवर, तर कधी कुठल्यातरी बागेत कोपऱ्यात कोणाला दिसणार नाही असं बसून केली. प्रॅक्टिस झाली की हळूच त्या दादाला गिटार पुन्हा नेऊन द्यायची. गिटार घेऊन येता-जाता सोसायटीतल्या कोणी पाहिलं की शेरेबाजी सुरू झालीच म्हणून समजा. कोणी त्याला मस्करीत ‘धनुष्य-बाण’ म्हणायचं, कोणी ‘रायफल’, तर कोणी ‘तूनतूनं’.

वर्षभरात मला जॉब लागला, पुण्यात असोशीएट सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून पोस्टिंग झालं. पण त्या धावपळीत गिटार शिकण्याचं स्वप्नं बॅकफुट वर गेलं! तोवर मला वाटायचं क्लास लावणं हे एकच सोल्यूशन आहे! पण आधी क्लाससाठी पैसे नव्हते आणि आता वेळ नव्हता! तुम्ही जॉब करत असाल, तर कदाचित माझी तेव्हाची अवस्था समजू शकाल. वैतागून जॉब सोडला मी एकदाचा. नंतर मॅथ्सचे क्लासेस, टुर गाईड, फ्रीलान्स रायटिंग असं करत पैसे साठवून काही महीने गिटारचा क्लास केला. पण बुडत्याला काडीचा आधार तरी किती वेळ धरून ठेवणार!

बरं त्यात अजून भर म्हणजे, मला आवडतील त्या मराठी गाण्यांच्या टॅबस् तेव्हा नेटवर नव्हत्या. पण आता युट्यूबवर थोडं २-३ तास भटकून झालं की काहीतरी हाती लागण्याचे चान्सेस तरी असतात.

मग एक दिवस मी ठरवलं! ठरवलं की या सगळ्या अडचणींना फ्लश करून टाकायचं. या अडचणी नक्कीच माझ्या आवडीपुढे छोट्या होत्या (म्हणजे अडचणी मोठ्या होत्याच, पण माझी आवड त्याहून मोठी होती).

अर्थात त्यावर सोल्यूशन मला मिळालंही! म्हणून तर ही ‘गिटारगिरी’ सुरू केली. पण पूर्ण स्टोरी आता इथे रंगवून सांगत नाही. शॉर्टमध्ये सांगायचं तर, जेवढं शिकलोय ते शिकवत मी पुढचं गिटारमधलं शिक्षण सुरू ठेवलं. सॉफ्टवेअर इंजिनियर, पत्रकार, वकील असे टॅग असलेला मी, नवी मुंबईतलं वडिलांच २ बी.एच.के. घर सोडून लोवर परेलच्या एका आठ-बाय-दहा फुटाच्या बैठ्याचाळीत २,६६६ /- रुपये भाडं देऊन राहू लागलो. कारण माझी पॅशन! मला माझी पॅशन इतरांवर लादायची नव्हती तर आधी स्वतःलाच सिद्ध करून दाखवायची होती. ६-७ हजारात (घरभाडं+तीन वेळचं जेवण+इतर खर्च भागवत) महिना काढायचा तर जे करावं लागेल ते सगळं केलं. पण गिटार प्रॅक्टिस आता थांबवायची नाही हे मनाशी पक्क ठरवून.

काही महिन्यांपूर्वी ‘तुम्हाला गिटार शिकण्याच्या प्रवासात नक्की काय अडचणी येतात?’ असा प्रश्न मी एका गुगल फॉर्मद्वारे विचारला होता. उत्तरं पहिली आणि चाट पडलो. या महाराष्ट्रात माझ्यासारखे गिटारचे वन-साइड-लव्हर अनेक आहेत यावर शिक्कामोर्तब झालंच एकदाचं. त्यांना मदत करण्यासाठी मला काहीतरी करणं गरजेचं होतं.

Ukulele शिकताना मी ज्या अडचणींतून गेलो त्यातून तुम्हाला जाण्याची गरज नाही. या सगळ्यावर One Stop Solution मी घेऊन आलोय ‘Ukulele Simplified-Marathi’ मध्ये, सगळ्यांना परवडेल असं.

तुमच्यासाठी जे जमेल ते करायची तयारी मी ठेवली आहे 
आधी Peaceful Guitar Formula मग GuitarGiri Quick Start Guide 
आणि आता हा Ukulele Simplified Course. .. चला तर मग लागा वाजवायला :) ..  

कोर्स अनुक्रमणिका - Course Curriculum

Module 1 - Introduction to Ukulele

  • Ukulele कोणासाठी आहे आणि का ?
  • Parts of Ukulele
  • Ukulele Tunning कशी करायची
  • Ukulele कसं पकडायचं 
  • Guitar Vs Ukulele - फरक आणि साम्य

Module 2 - Lets Learn Chords

  • Chord Family म्हणजे काय ?
  • सर्व Major आणि Minor Chords कशा पकडतात 
  • काही महत्वाच्या Tips Chords पकडताना

Module 3 - All About Strumming

  • Strumming Basics
  • Metronome कसा वापरतात 
  • काही मूलभूत Strumming Pattern एकदम Beginner आहेत त्यांच्यासाठी 

Module 4 - Song Tutorials

  • Happy Birthday, माळ्याच्या माळ्यामंदी, मी डोलकर...  वर अनुक्रमणिकेत सांगितली आहेत ती १० गाणी
  • ही गाणी कोर्स मध्ये 'सोप्पी ते अवघड' अशा चढत्या क्रमाने लावलेली आहेत 
  • प्रत्येक गाण्याच्या Chords, Strumming Pattern आणि सोबत लिखित स्वरूपात गाण्याचे बोल या सर्व गोष्टी प्रत्येक विडियो मध्ये आहेत 
  • जिथे गरज आहे तिथे गाण्याच्या Level नुसार इतर tips सुद्धा दिलेल्या आहेत 

Module 5 - Song Mash Up कसे करतात.

या पाचव्या Module पर्यंत शिकून झाल्यावर तर काय तुम्हीच प्रत्येक पिकनिकचे स्टार असणार आहात !!
मग इथून पुढे नुसता कल्ला !!!

Fees : ₹ 2,000/-

50% Off

Today's Limited Time Offer : ₹ 999/-

00
Days
:
00
Hours
:
00
Minutes
:
00
Seconds

हा कोर्स म्हणजे गोंधळ नाही, घाबरवणं नाही-
 फक्त एक सरळ, सोपा, आनंददायक प्रवास – गाण्यांकडे नेणारा. आणि...
आत्ता नाही तर कधी?

FAQs

  • हा कोर्स मी किती वेळ बघू शकते/शकतो?- उत्तर – तुम्ही हवं तेव्हा लॉगिन करू शकता, वरील प्राइज मध्ये तुम्हाला लाईफ-टाइम Access मिळणार आहे. हा रेकॉर्डेड व्हिडिओ ukulele कोर्स तुम्हाला सवडीनुसार हवा तेव्हा बघता येईल. अगणित वेळा! मोबाइल, लॅपटॉप, टॅब अशा कुठल्याही डिवाईस वरून हे कोर्स पाहता येतील.
  • मला Course मध्ये काही समजलं नाही तर कसं/कोणाला विचारता येईल? - उत्तर – त्यासाठी आपली GuitarGiri Community ची Silver Membership आहे ती Join करू शकता. किंवा मला Mail द्वारे सुद्धा तुमचे प्रश्न विचारू शकता. 
  • मी हे सगळं ‘YouTube’ वरून Direct शिकू शकत नाही का त्यासाठी EBook कशाला हवं? - उत्तर – युट्यूब एक भन्नाट प्लॅटफॉर्म आहे. ज्ञानाचा महासागरच म्हणा हवं तर. पण तुमच्या प्रश्नाच्या उत्तराचा थेंब या महासागरात शोधण्यासाठी डझनभर तास आणि तुमच्या डिवाईसची बॅटरी वाया घालवावे लागतील. युट्यूब वरून शिकणं चांगलं नाही असं नाही. आमचा स्वतःचा सुद्धा युट्यूब चॅनल आहे, ज्यावर आपण इतर गिटार संबंधित माहिती पोस्ट करत असतो. पण फक्त युट्यूब वरून शिकणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. शिवाय तिथे हव्या त्या क्रमात लेसन्स दिलेले नसतात.आणि त्याहून महत्वाचं मला असं वाटतं की, तुमच्या वेळेची किंमत नक्की किती? यावर सगळं डिपेंड करतं.
    या कोर्समुळे तुमचा वेळ वाचेल. आणि तुमच्या वाजवण्यात इम्प्रूवमेंट ‘युट्यूब’पेक्षा पटकन दिसतील. काही लोकं तर या कोर्स एवढे पैसे एक किंवा दोन तासाच्या गिटारक्लास वर खर्च करतात. जर तुमच्या वेळेची इतकीही किंमत नसेल, तर ती किंमत तेवढी होईपर्यंत युट्यूब वरच शिकलेलं बरं.
  • मी Ukulele किती रुपयापर्यंत घ्यावी? - उत्तर – बेसिकसाठी 3 ते 4 हजार पर्यंत सगळेच ब्रॅंड चांगल्या Ukulele देतात, जी 2-3 वर्ष हमखास टिकेल, काहींची 10 वर्ष सुद्धा टिकलेली मी पहिली आहे. पण एकदम एक-दीड हजारातली वर्षभरात काहीतरी प्रॉब्लेम देतेच. तुमचं बजेट 3 च्या वर जाईपर्यंत थांबलात तर बरं होईल. मग तोवर महिनाभर दुसऱ्याची ukulele वापरली तरी हरकत नाही.
  • हा कोर्स मी Ukulele घेण्याच्या आधी घेऊ की नंतर? - उत्तर – हे पूर्ण पणे तुमच्यावर डिपेंड करतं. तुमचं बजेट असेल तर दोन्ही एकसाथ घ्यायला हरकत नाही. पण let me tell you, ही कोर्सची प्राइज कधीही वाढू शकते.
  • ‘Ukulele Simplified’ कोर्स कधी सुरू होईल? - उत्तर – तुम्ही Successful Payment केल्यावर तुम्हाला २४ तासांत Access लिंक्स मेल मधून मिळतील. त्यावर क्लिक करून तुम्हाला तुमचा Musical प्रवास सुरू करता येईल.
  • मी कोर्स विकत घेतल्यानंतर मला तो आवडला नाही तर? मला माझे पैसे परत मिळतील का? - उत्तर – नक्कीच! तुम्हाला कोर्स आवडला नाही तर तुम्ही तुमचं सभासदत्व १४ दिवसांच्या आत रद्द करू शकता. तुम्हाला हवं ते मी देऊ शकत नसेन तर मला तुमचे पैसे घेण्यात मजा येणार नाही. फक्त मला Connect@ guitargiri.com वर मेल करा. पाच दिवसांत तुमचे पैसे परत केले जातील :) .
    Ukulele खूप आकर्षक वाद्य आहे, आणि माझी ऑफर सुद्धा. भावनिक होऊन Enroll करणाऱ्यांना माझी एकच विनंती की, कृपया, खरंच तुम्ही हा कोर्स पाहिला, त्यावर प्रयत्न केले आणि तो नाही पटला तरच पूर्ण हक्काने रिफंड मागा. माझ्याकडे Already १५००+ लोकांची कम्युनिटी आहे, जी मला कुटुंबाप्रमाणे आहे. मला त्यांच्या Growth लक्ष द्यायला जास्त आवडेल. आपल्या सगळ्यांचाच वेळ महत्वाचा आहे. तुम्हाला वाटतंय की, तुम्ही Ukuleleला दिवसातून 15 मिनिट सुद्धा प्रॅक्टिससाठी देऊ शकत नाही, तर हा कोर्स तुमच्यासाठी नाही, In Fact ukulele च तुमच्यासाठी नाही आहे. त्यामुळे माझ्यासोबत असणाऱ्या मराठी गिटार मास्टर्सच्या Skills वर माझं पूर्ण लक्ष रहावं, यासाठी मला तुम्ही इतकी मदत तर नक्कीच करू शकता. समजून घेतल्याबद्दल धन्यवाद!

© 2025 GuitarGiri. All Rights Reserved | Design by Yashwant Didwagh